गोंदिया : युथ 4 जॉब्स फाउंडेशन ग्रॉस रूट अकॅडमी तर्फे 16 मार्च रोजी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी गट विकास अधिकारी श्री किशोर गुडे सर, उपविभागीय आयुक्त समाज कल्याण विभाग श्री विनोद मोहतुरे सर, जिल्हा महिला अर्बन बँकेचे अध्यक्ष सौ. माधुरी नासरे मॅडम, लोकमत सखी मंच जिल्हा सहयोजिक सौ जोस्तना सहारे मॅडम, अनाथांची माय सौ सविता बेदारकर मॅडम, महात्मा फुले मंडळ जिल्हा व्यवस्थापक श्री विनोद ठाकुर सर, शिक्षण विभाग श्री विलास मालवार सर, अपंग कल्याणकारी संघटना अध्यक्ष सौ संगीता रोकडे मॅडम, राजेश कोहळे सर, शोभेलाल भोंगडे सर, युथ 4 जॉब्स फाउडेशन प्रमुख विष्णु वर्धन सर, प्रकल्प राज्य प्रमुख महेंद्र पाटील सर, सहजयोग ध्यान केंद्र सदस्य सौ सुनीता शर्मा, युथ 4 जॉब्स फाउडेशन टीम व दिव्यांग बंधू बघिणी उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी दिव्यांगासाठी असलेल्या विवीध योजना व राबल्या जाणाऱ्या उपक्रमा बद्दल माहिती दिली, प्रशिक्षित दिव्यांग बंधू बघिणीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले