Friday, October 11, 2024
Google search engine
HomeUncategorizedरस्त्याचे मधोमध असलेले विद्युत खांब हटवा

रस्त्याचे मधोमध असलेले विद्युत खांब हटवा

सडक अर्जुनी : तालुक्यातील गोसाई कोकणा गावातील रस्त्यावर मधोमध विद्युत खांब असून शेतात जाणारे ट्रॅक्टर,बैलबंडी तसेच नागरिकांना ये-जा करतांनी त्रास होत आहे.रस्त्याचे मधोमध विद्युत खांब असल्याने गावाबाहेरून ये-जा करावी लागत आहे.यापूर्वी कच्चा रस्ता असल्याने नागरिकांना ये-जा करतात येत असे.पण दोन महिने आधी सिमेंट रस्त्याचे काम कंत्राटदाराने केले तेव्हा रस्त्याची उंची दोन्ही बाजूला उंच असल्याकारणाने बैलबंडी व ट्रॅक्टर यांना आजुबाजुला घरे असल्याने जाता येत नाही.ग्रामपंचायत विद्युत खांब हटविण्यासाठी पैसै भरत असेल तरच मधोमध असलेला विद्युत खांब बाजुला रस्त्याचे कडेला गाड्या येईल असे विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी सांगतात.पण एखादं मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता ग्रामपंचायत ने पैसै भरून त्वरीत विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments