बाकटी शेतशिवारातील घटना
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील बाकटी येथील शेतशिवारात मका तोडणीसाठी गेलेल्या महिला मजुरावर रानडुकरांने हल्ला केल्याने एक महिला ठार झाली. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान घडली, असून देवला रविंद्र राजगीरे वय 37 रा.बाकटी असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बाकटी येथील देवला रविंद्र राजगीरे ही महिला अन्य चार पाच महिला मजुरासह गुरुवार ता.20 एप्रिल ला सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान बाकटी-सोमलपुर मार्गावरील गोपाल बनकर यांचे शेतात मका पिकांची कापणी करण्यासाठी गेली होती. मका कापनीचे काम सुरु असताना अंदाजे आठ ते साडेआठच्या सुमारास त्याच बांधीत दबा धरुन बसलेल्या रानडुकरांने अचानक देवलाबाई राजगीरेवर जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याने एकच खळबळ उडाली. सर्व महिला मजुरांनी आरडाओरड केल्याने रानडुकर पळुन गेला.
गंभीर जखमी देवलाबाई ला तातडीने साकोली येथील शासकीय कुटिर रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे प्राथमीक उपचार झाल्यानंतर व जखम गंभीर असल्याने देवलाबाई ला भंडारा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सकाळी अंदाजे साडे अकरा वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असताना त्या मृत पावल्या. घटना समजताच वनविभागाचे नवेगांवबांध रेंजचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर कटरे यांनी आपली चमू घटनास्थळी पाठविली. क्षेत्रसहाय्यक व्हि.एम. करंजेकर, वनरक्षक सयाम यांनी गंभीर जखमी महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी मदत केली. नवेगांवबांध चे वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर कटरे यांनी तातडीने पंचनामा करुन सुरुवातीची तातडीची आर्थिक मदत देण्याचे आदेश देवुन शवविच्छेदन अहवालानंतर शासकीय मदत त्वरीत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. सध्या अर्जुनी मोर तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापुर्वी महागांव, अरुणनगर व वारवी येथे वाघाने हल्ला करुन दोन पुरुष व एक महिला यांना ठार केले होते. अर्जुनी मोर.तालुक्यात शेतशिवाराला लागूनच जंगल परिसर असल्याने व मोठ्या प्रमाणात जंगली हिंस्त्र पशूंचे मानवावर हल्ले होत असल्याने तालुक्यातील नागरीकांमधे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतक देवला रविंद्र राजगीरे यांना पती, सासरा व दोन मुले आहेत.
रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार
RELATED ARTICLES