Tuesday, June 25, 2024
Google search engine
Homeगोंदियारापेवाडाचे माजी सरपंच सौ.येडे यांची घरवापसी-कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

रापेवाडाचे माजी सरपंच सौ.येडे यांची घरवापसी-कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

 

प्रतिनिधि/गोंदिया : तालुक्यातील रापेवाडा येथील माजी सरपंच सौ.भुमिताबाई येडे व अंकुश येडे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली. त्यानी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. पक्ष प्रवेश दरम्यान त्यांचे भाजप पदाधिकार्‍यांनी स्वागत केले.

रापेवाडाचे माजी सरपंच सौ.भुमिताबाई येडे व अंकुश येडे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली. मध्यंतरी त्यांनी भाजपला रामराम ठोकून दुसर्‍या पक्षाची वाट धरली होती. परंतु, भाजपची विचारधारा आणि जन विकासकार्यांना प्रेरीत होवून त्यांनी भाजपमध्ये परत आले. यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी पक्ष दुपट्टा व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, जि.प.सभापती संजय टेंभरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावनाताई कदम, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, शालिनी डोंगरे, रिता बागडे, राजेश चतुर, बाबा बिसेन, सुभानराव रहांगडाले, स्नेहा गौतम, बाबा बिसेन, संजय मुरकूटे, मिलिंद बागडे, पुजा चंद्रवंशी, किरण रावते, उमा महाजन, अशोक जयसिंघानी, मनोज पटनायक, राकेश अग्रवाल, योगेश उके, देवलाल पटले, संदिप रहांगडाले आदिसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments