गोंदिया. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान व देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या रक्षणासाठी अर्पित, वीरपुत्र महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेन्द्र जैन, अशोक सहारे, देवचंद ठाकरे, मनोहर वालदे, खालिद पठाण, के. के. पंचबुद्धे, हरिराम आसवानी, केतन तुरकर, संकल्प जैन, एकनाथ वहिले, दीपक कनोजे, महेश करियार, नागो बन्सोड, सुनील पटले, शैलेश वासनिक, कपिल बावनथड़े, तुषार ऊके, दिलीप बिसेन, रौनक ठाकुर, वामन गेडाम, कुणाल बावनथड़े,कान्हा बघेले, योगी येडे, गौरव शेंडे, सहीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक व क्रांतिकारी चंद्रशेखर आज़ाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
RELATED ARTICLES