गोंदिया : आज बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय जननेता स्व.अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले ही घटना वेदनादायी व धक्कादायक आहे. जनसेवेचा वसा, कणखर नेतृत्व व प्रशासनावर जबर पकड असलेले दादा यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आमच्या राष्ट्रवादी परिवाराचा आधारस्तंभ हरपला असल्याची भावना व्यक्त करीत खा.प्रफुल पटेल यांनी करीत भावपूर्ण श्रद्धाजंली दिली.
सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व, लोकप्रिय जननेता स्व.अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काळा दिवस ठरला आहे. त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे संपन्न झालेल्या शोक सभेत त्यांच्या तैलचित्रावर पुष्प वाहून, अश्रुपूर्ण व भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करीत ईश्वर मृतात्म आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना उपस्थित सर्वांनी केली यावेळी असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी श्रद्धाजंली देतांना म्हणाले कि, महाराष्ट्रातील अनुभवी, कर्तृत्ववान, कष्टकरी, शेतकरी, वंचित व शोषित जनतेचा आवाज हरपला असून या दुःखद घटनेमुळे मी निःशब्द झालो आहे. पवार कुटुंबियांच्या व सर्व जनतेच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याने वाहिली स्व.अजितदादा पवारांना श्रध्दाजंली
RELATED ARTICLES






