गोंदिया : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे मागील वर्षी महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात वर्षपूर्ती झाल्यानंतर ही युवकांना रोजगार, महागाई, शेतकरी, शेतमजूर या सारख्या सर्वच प्रमूख मुद्यावर अपयशी ठरलेल्या या खोके सरकार शिंदे गटाविरोधात सत्तांतराचा निषेध म्हणून प्रतीकात्मक घोषणा करून ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध करण्यात आला. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केतन तुरकर, अशोक शहारे, भगत ठकरानी, दीपक कनोजे, सुनील कुरेशी, मनोहर वालदे, सुनील पटले, शैलेश वासनिक, लवली होरा, पिंटू बनकर, लव्ह माटे, राजू येडे, योगी येडे, अरमान जैस्वाल, रमण उके, गौरव शेंडे, सरभ मिश्रा, कपिल बावनथडे, तुषार उके, अनुराग बोरकर, राज शुक्ला, आरजू मेश्राम, कुणाल बावनथडे, प्रमोद कोसरकर, यश खोब्रागडे, वामन गेडाम, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, श्रेयश खोब्रागडे, अनुज जैस्वाल, अंशुल खोब्रागडे, दाऊद खान, सहीत मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध
RELATED ARTICLES