Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedरेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

गोंदिया : शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. शहरातील नागरीक, विद्यार्थी, व्यापारी यांना उत्तर- दक्षिण जाण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागला होता. गोंदिया शहरातील नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला आज शनिवारपासून सुरुवात झाली. यामुळे शहरवासीयांची मोठी अडचण दूर झाली आहे. खा. प्रफुल पटेल यांनी याची गांभीर्याने दखल घेत उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरित सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत आज पासून या रेल्वे पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत या बांधकामाला सुरुवात झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. यावेळी सर्वश्री अशोक शहारे, जनकराज गुप्ता, माधुरीताई नासरे, मनोहर वालदे, अखिलेश शेठ, केतन तुरकर, नानू मुदलियार, रवी मूदडा, रफिक खान, विशाल शेंडे, विनीत सहारे, सुनील भालेराव, सचिन शेंडे, विजय रगडे, विनोद पंधरे, कुंदाताई दोनोडे, इकबाल सैय्यद, दिनेश अग्रवाल, जुनेद शेख, राज शुक्ला, बंटी चौबे, वेनेश्वेर पंचबुद्धे, जिम्मी गुप्ता, एकनाथ वहिले, चंद्रकुमार चुटे, संजीव राय, विनायक खैरे, नागो बन्सोड, आनंद ठाकूर, राजेश कापसे, विजेंद्र जैन, सुनील पटले, शैलेश वासनिक, दिलीप डोंगरे, लखन बहेलिया, कपिल बावनथडे, सोनू मोरकर, वामन गेडाम, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे गोंदिया शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments