Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedलग्नापूर्वी नवरदेवाने दोन तास दिले गावासाठी!

लग्नापूर्वी नवरदेवाने दोन तास दिले गावासाठी!

भजेपार येथे दर रविवारी ग्राम स्वच्छता मोहीम
रविवारचे दोन तास गावासाठी, गावच्या समृद्धीसाठी उपक्रम
सालेकसा: ‘रविवारचे दोन तास गावासाठी, गावच्या समृद्धीसाठी’ या अभिनव संकल्पनेतून सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे दर रविवारी ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रविवार दिनांक 27 मार्च रोजी याच मोहिमेत चक्क नवरदेवाने सहभागी होऊन गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
मोहिमेच्या चौथ्या आठवड्यात स्वच्छ्ता दुत भजेपार अंतर्गत माताटोला येथे दाखल होताच तेथील तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. दरम्यान नागरिकांचा आणि विशेषतः युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील हनुमान मंदिर पासून माताबोडी परीसर तथा बोरवेल आणि विहिरीचे ओटे स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती घालण्यात आली. या मोहिमेत ईतर युवकांसह नवरदेव यशवंत चुटे हा युवकही सहभागी झाला. तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. लग्नाला जाण्यापूर्वी स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या या युवकाने जणू गावकऱ्यांना स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. यावेळी सरपंच चंद्रकुमार बहेकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू बहेकार, ग्रा.पं. सदस्य आत्माराम मेंढे, रवीशंकर बहेकार, रोजगार सेवक गोपाल मेंढे, रेवत मेंढे, लोकेश चुटे, गोविंद मेंढे, यादोराव मौजे, वसंत हेमणे, मंगेश मेंढे, शुभम खोटेले, रमेश बहेकार, विकास नागपुरे, सुरेश सापकने, नंदकिशोर कठाने, राजेश वाकले, विरेंद्र वाकले, प्रमोद मौजे, सुनील फुंडे, सुरेश गायधने, बालिकचंद मेश्राम, धनराज रहिले, अनुराग वाढई, देवेंद्र हेमने, दुर्गेश महारवाडे, अरविंद महारवाडे, मुलचंद चुटे, हंसराज बहेकार, प्रकाश शेंडे, कृष्णा शिवणकर, विक्की महारवाडे, अमित ब्राह्मणकर, मोहित बहेकार सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या सुट्टीचा दिवस सत्कार्यासाठी घालण्याच्या उद्देशाने कुठल्याही एका परिसराची निवड करून गावातील युवक व नागरिक ग्राम स्वच्छता अभियान राबवत असून या मोहिमेला आता हळू हळू लोक चळवळीचे स्वरूप येत असल्याचे बोलले जात आहे.

स्वच्छ्ता ही लोकचळवळ व्हावी…
गावाची समृद्धी, विकास आणि आरोग्य हे ग्राम स्वच्छतेवर अवलंबून आहे. त्यामुळे स्वच्छता ही केवळ प्रशासनाचे काम न राहता लोकचळवळ व्हायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने गावा गावात समृद्धी येईल. प्रत्येक व्यक्तीने वेळ काढून या मोहिमेत आपली भूमिका निभावली पाहिजे. ग्राम स्वच्छता अभियान हा उपक्रम प्रशंसनीय आहे.
– यशवंत चुटे, नवरदेव.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments