गोंदिया : रामनगर पोलिसांनी शक्ती चौक,गोंदिया येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणारा ईसम नामे- जय सुनील करियार, यास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसंमावर, तसेच अवैध शस्त्रे, हत्यारे बाळगणारे ज्यामुळे कायदा सुव्यवस्स्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अश्या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे आज दिनांक 21/03/2024 रोजी उपविभागीय पोलिस. अधिकारी, उपविभाग गोंदिया- रोहिणी बानकर, मॅडम, पोलीस निरीक्षक – संदेश केंजळे पो. स्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामनगर पोलीस पथक परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदारकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम हा शक्ती चौक परिसरात शर्टाचे मागील बाजूस आतमध्ये एक लोखंडी तलवार लपवून संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे माहिती मिळाल्याने सदर इसमाचा शक्ती चौक परिसरात शोध घेत असताना एक इसम संशयित स्थितीत फिरताना दिसून आला. त्यास पोलीस स्टाफ नी ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव जय सुनील करियार वय-46 वर्ष रा. बजाज वार्ड दस खोली गोंदिया असे असल्याचे सांगितले पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून एक मोठी लोखंडी तलवार मिळून आल्याने पंचासमक्ष रीतसर पंचनामा कारवाई करून लोखंडी तलवार व आरोपी यास ताब्यात घेऊन पोहवा राजेश भगत याचे तक्रारी वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध रजिस्टर क्रमांक 76/024 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा, सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असुन तपासात आहे. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनात सपोनी उमेश माळी,स.फौ. राजेश भुरे, पो. हवा. राजेश भगत, छत्रपाल फुलबांधे, सुनीलसिंह चौव्हाण, बाळकृष्ण राऊत कपिल नागपुरे, यांनी केलेली आहे.