Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedलोखंडी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोखंडी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी
गाेंदिया : पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी सन- उत्सव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणाचे निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शा. पोलीस पथकाने गोंदिया शहरात पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी सुमित महानंदे, रा. सावराटोली, गोंदिया यांचे राहते घराची पिस्टल बाबत झडती घेवून शहानिशा केली असता त्याचे राहते घरी बेडरुम मधील लाकडी दिवानमध्ये एक लोखंडी पिस्टल मॅगझिनसह किंमती 25,000/-रु चे अग्निशस्त्र अवैधरित्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आहे. अवैधरित्या पिस्तुल, बाळगल्याप्रकरणी फरार आरोपी सुमित विनोद महानंदे, वय 32 वर्षे रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया, भुपेंद्र विनोद महानंदे, वय 28 वर्षे, रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया यांचे विरुद्ध पो. ठाणे गोंदिया शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, सह कलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कायदेशीर कारवाई गोंदिया शहर पोलिस करीत आहेत. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पो.नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजु मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments