स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गोंदिया : कौटुंबिक वादातून मुलाने स्वत:च्या वडीलाला काठीने बेदम मारहाण करून ठार केले व घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना तिरोडा तालुक्यातील बोदा येथे शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. भैय्यालाल पतिराम नागदेवे (वय 52 रा. बोदा) असे मृत वडीलाचे तर लंकेश भैय्यालाल नागदेवे (वय 24) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाच्या सहाय्याने अवघ्या काही तासातच आरोपीला भंडारा जिल्ह्यातील वरठी या गावातून अटक केली.
बोदा येथील भैय्यालाल नागदेवे यांना दोन पत्नी असून ते एक पतमनीसह गावातीलच बौध्दविहारात राहत होते. दरम्यान, त्यांनी आरोपी लंकेशला दोन ट्रॅक्टर खरेदी करून दिले होते. मात्र, लकेंश त्यापासून मिळणारी कुठलीही मिळकत वडीला देत नव्हता किंवा त्यांना कसलाच हिशेबही देत नसे. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. घटनेच्या दिवशी शनिवारी लंकेशने शेतात जातो म्हणून ट्रॅक्टर घेऊन गेला. दरम्यान, त्याच्या परत आल्यावर भैय्यालाल यांनी त्याला हिशेब विचारला यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी लंकेशचा राग अनावर झाला व त्याने भैय्यालाल यांना काठीने बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वडील मरण पावल्याचे समजून येताच लंकेश घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. दवनीवाडाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतिश जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दवनीवाडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपीच्या शोधात वेगवेगळी पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. ज्यामध्ये आरोपी लंकेश हा भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश लबडे व त्यांच्या पथकाने आरोपी लंकेश यास वरठी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहे.
वडिलांचा खून करणाऱ्या मुलास अवघ्या काही तासात अटक
RELATED ARTICLES