अर्जुनी मोरगाव : पुयार-वडेगाव रस्त्याचे बांधकामावर मागील ३ वर्षांपासून स्थगिती आली आहे. डांबरीकरणाचे काम २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता आहे. मागील ३ वर्षांपासून रस्ता बांधकामाचे काम पूर्ण न झाल्याने या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनधारकांचे हाल होत आहेत. त्यासंबधी अर्जुनी तालुक्यातील वडेगाव येथे ७ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, कन्हाळगाव, व लाखांदूर तालुक्यातील पुयार या तीन गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रास्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद दिला.
गत काही वर्षापासून, अर्धवट असलेल्या वडेगाव- पुयार मार्गाचे काम ठप्प असल्याने, ग्रामस्थांनी अनेकदा विविध कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. मात्र, पत्र व्यवहारांचा कसलेही उत्तर आले नसल्याने, ( ता.७) ला वडेगाव येथील रेल्वे फाटक जवळ वडेगावचे सरपंच श्रीकांत लोणारे, पुयारचे सरपंच शैलेश रामटेके, कन्हाळगावचे सरपंच आनंदराव सोनवाणे या तिन्ही गावातील सरपंचाचे नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात सकाळी ६ ला जाणारी ईटखेडा – भंडारा मार्गची बस या आंदोलनात अडकली.
पुयार-वडेगाव रस्त्याचे बांधकाम थांबल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण झाले आहे. या अर्धवट बांधकामामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पुयार-वडेगाव रस्ता हा दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर अर्धवट राहिलेल्या बांधकामावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वरील खड्डे टाळतांना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.
दरम्यान, रस्त्याचे बांधकाम २0१८ पासून सुरू करण्यात आले. मात्र, तीन वर्षे पूर्ण होऊनही हा रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. अशा परिस्थितीत शाळा-कॉलेजचे विद्यार्थी ये-जा करत राहतात. तसेच नागरिकांना तुम्हाला या मार्गाने यावे – जावे लागते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चारचाकी वाहन चालकांचा तोल जात असून, अनेक अपघात झाले आहेत.
या रस्त्याच्या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुयार- वडेगाव या मार्गाच्या कामाला चालू करून गती देण्यात यावी, अन्यथा आम्ही या रास्ता रोको आंदोलनातून माघार घेणार नाही असेही त्या आंदोलनात नागरिक म्हणाले. जेव्हा पयर्ंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तेव्हापयर्ंत आम्ही आंदोलनावरून उठणार नाही, असे म्हणत होते. मात्र, अर्जुनी विधानसभेचे माजी आमदार राजकुमार बडोले व शिवासेना नेते संजय जयस्वाल, सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी या मोर्चाला भेट देऊन, आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. या मार्गासाठी प्रस्ताव दिलेला आहे. तो लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनाला वडेगावचे सरपंच श्रीकांत लोणारे, पुयारचे सरपंच शैलेश रामटेके, कन्हाळगावचे सरपंच आनंदराव सोनवाणे, नितीन धोटे, विजय खुणे, संदीप लोणारे, सुभाष ढोरे, संजय कांबळे, हिरालाल पारधी, धर्मेंद्र राऊत, प्रकाश दिघोरे, महेश भोयर, यासह बहुसंख्य नागरिक या आंदोलनात सहभागी होते.
वडेगाव ते पुयार मार्गावर रास्ता रोको आंदोलन
RELATED ARTICLES