Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedवयाच्या १०० व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे...

वयाच्या १०० व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन..

 

अहमदाबाद:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज शुक्रवारी पहाटे ३.३० वा. उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली.

हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा जन्म 18 जून 1923 रोजी गांधीनगर येथे झाला. गांधीनगर शहराच्या सीमेवरील रेसन गावात पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत हिराबेन राहतात.

हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांचे उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेन यांचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments