शासकीय रुग्णालयातील चित्र
गोंदिया : जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल एकीकडे रुग्णाच्या प्रकतीची धाकधूक व दुसरीकडे रात्र कुठे काढायची याची चिंता अशा दुहेरी कोंडीत रुग्णांच्या नातेवाईकांना राहावे लागत आहे. नातेवाईकांना कडाक्याच्या थंडीत जिन्याच्या पायºयांवर किंवा ओपीडीच्या वºहांड्यात रात्र काढावी लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासह शेजारील जिल्हा व प्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही येतात. रात्रीच्या वेळी रुग्णाजवळ त्याचा नातेवाईक असणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णासोबत राहत असलेल्या नातेवाईकांना रात्री निवाºयाची सोय उपलब्ध होत नसल्याने त्यांना जिन्याच्या पायºयावर किंवा ओवीडीच्या वºहांड्यात झोपण्याची वेळ येते. सध्या हिवाळ्याचे दिवस असून रात्री कडकडत्या थंडीचा सामना करावा लागत असून नातेवाईकच आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच सकाळी प्रातविधी, आंघोळ कुठे करायची, हा प्रश्नही नातेवाईकांसमोर असतो. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून यावर पुरेश्या उपाययोजना होत नसल्याने रुग्णांसोबत राहत असलेल्या नातेवाईकांना रुग्ण बरा होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याशिवाय पर्याय नसतो.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219