अर्जुनी मोरगाव तालुक्यात पट्टेदार वाघाची दहशत!
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील पाच-सहा दिवसांपासून एका पट्टेदार वाघाचा वावर आहे. शेतकºयांसह वाटसरूंना या वाघाचे दर्शन झाले आहे. यामुळे परिसरातील गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगत असलेल्या जंगलात थोडीफार हलचल झाली की, वाघोबा आला पळा पळा… अशी बोंब पहावयास येत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असल्याने हिंस्र जंगली जनावरांचा वावर वाढलेला आहे. 27 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास वडेगाव रेल्वे जंगल परिसरात पट्टेदार वाघाने प्रवेश केला. हे दृश्य वडसा वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयातसुद्धा कैद झाले आहे. तीन दिवसांपूर्वी अर्जुनी मोरगाव-साकोली मार्गावर निमगाव ते अरततोंडी फाट्यादरम्यान पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यापूर्वी तालुक्यात अरुणनगर व महागाव येथील दोन जणांना वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. तर तालुक्यातील वारव्ही (केशोरी) येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या या परिसरात रब्बी पिकाचा हंगाम सुरू असून उन्हाळी धान पिकासह मका व उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यातच आता या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतीची कामे करणारे मजूर व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219