गोंदिया : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे आदेश व निर्देशां प्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जयेश भांडारकर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात 07 एप्रिल रोजी दुपारी स्पेशल ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान जिल्हा वाहतुक शाखा पथकाद्वारे शहरांतील जयस्तंभ चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक , मनोहर चौक ईत्यादी ठिकाणी धोकादायकरित्या वाहन चालविणे, अल्पवयीन वाहन चालविणारे, ट्रिप्पल सिट वाहन चालविणारे, वाहन चालवितांना मोबाईल वर संभाषण करणारे आणि सिग्नल तोडणारे अश्या अंदाजे ५५ ते ६० वाहन चालकां विरूध्द कारवाई करून त्यांची वाहने जिल्हा वाहतुक शाखेत जमा करण्यात आले. वाहतुक पोलीसांचा उदिष्ट हा सुधारणात्मक असुन दंडात्मक नसल्याने व ही पहिलीच वेळ असल्याने सर्व वाहन चालकांना पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी त्यांच्या कक्षामध्ये समुपदेशन केले. आणि अशाप्रकारच्या वाहन चालविल्यामुळे स्वतःच्या जिवीताला धोका होतो, त्याचबरोबर ईतरांना सुध्दा जसे पायी चालणारे नागरीक व ईतर वाहन चालकांच्या जिवीताला धोका होतो. तरी आपण अशाप्रकारे वाहन चालवु नये. ट्रिप्पल सिट वाहन चालवु नये, ज्याच्याकडे परवाना नाही त्यांनी वाहन चालवु नये. अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देवु नये. सिग्नल तोडु नये याबद्दल समुपदेशन करण्यात आले समुपदेशन केल्यानंतर कारवाई केलेल्याना ही त्यांची पहिलीच वेळ असल्याने सुधारणा व्हावी या करीता सोडुन देण्यात आले आहे.
यापुढे जर पुन्हा वाहन चालकांद्वरे असे प्रकार दिसुन आल्यास, वाहतुकी च्या नियमांचे उल्लंघन केल्यास , करणाऱ्यास मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची ताकीद आणि समज देण्यात आली आहे. पुनःश्च जिल्हयातील जनतेला गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा वाहतुक शाखेतर्फे वाहतु कीच्या नियमांचे काटेको रपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वाहतुकीच्या नियमनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या 55-60 जणांवर कारवाई
RELATED ARTICLES