: मुंडीकोटा गावाजवळील यडमाकोट येथील रहिवासी मंगला हेमचंद नारनवरे वय ५१ वर्ष असून रोजगार हमी योजना कामावर जात असतानाच वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आज 18 मे रोजी रोजगार हमी योजनेचा पहिला दिवस होता. ती आज कामाला गेली असता दुपारच्या दरम्यान वीज चमकून पडल्याने मंगला बाई नारनवरे कामाला जात असतानाच रस्त्यामध्ये वीज पडल्याने मृत्यू झाल्याची ह्दयदायक घटना घडली आहे. महिलेसह कुत्र्यांच्या देखील मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी तिरोडा पोलिसांना दिली आहे.