गोंदिया : देवरी आमगाव मुख्य रस्त्यावरील डवकी फाट्यानजिक दी.4 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजे दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात गोटाबोडी येथील रहिवासी कु. तेजस्विनी सुभाष राऊत वय 12 कू.डिलेश्वरी दुर्योधन राऊत वय 12,तसेच कू.सोनम भारत सोनवणे वय 12 जखमी झाल्या. त्यात तेजस्विनी राऊत गंभीर जखमी झाली असून,ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, तेजस्विनी राऊत, डिलेश्वरी राऊत, सोनम सोनवणे, या तिन्हीही विद्यार्थिनी असून, तेजस्विनी राऊत देवरी येथील आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे. तर डिलेश्वरी तसेच सोनम ह्या दोघेही जि. प.हायस्कूल तसेच वरिष्ठ प्राथशाळा देवरी येथे सहाव्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे या तिन्ही विद्यार्थिनी ग्राम गोटाबोडी वरून आपल्या सायकलने शाळेत जात असताना, देवरी आमगाव मुख्य रस्त्यावरील डवकी फाट्यावर अचानक मधमाशांनी या तिघांवरही हल्ला केला. हल्ल्यामध्ये तेजस्विनी राऊत हि गंभीर जखमी झाली असून, ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू आहे तर, डिलेश्वरी राऊत तसेच सोनम सोनवणे यांची प्रकृती स्थिर आहे.
विद्यार्थांवर मधमाशांचा हल्ला; देवरी-आमगाव रोड डवकी फाट्याजवळील घटना
RELATED ARTICLES