Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedविद्युत मोटार पंप चोरीचा धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर जेरबंद

विद्युत मोटार पंप चोरीचा धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर जेरबंद

1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त
गोंदिया : पोलीस ठाणे तिरोडा परिसरातील सालेबर्डी, धादरि, उमरी, सरांडी तीरोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटार पंप मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असल्याने स्था.गु. शां.चे पोलीस पथक विद्युत मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा मागील दोन महिन्यापासून छडा लावण्यासाठी शोध घेत होते. विद्युत् मोटार पंप चोरांचा शोध घेत असताना दिनांक- 09/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय बातमीदारकडून खात्रीशिर माहिती मिळाली की,इसम नामे- जितेंद्र पटले याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विद्युत् मोटार पंप चोरलेल्या असून लपवून ठेवलेल्या आहेत….. अश्या प्राप्त खात्रीलायक माहितीवरुन मोटर पंप चोरीचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार जितेंद्र रुपचंद पटले वय-35 वर्ष, आकाश राधेश्याम पटले वय-27 वर्ष, रुपेश रमेश उके वय- 33 वर्षे राहणार- तिन्ही धादरी ता.तिरोडा जि.- गोंदिया अश्या तिघांना विद्युत मोटार पंप चोरीच्या गुन्हा संबंधाने ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनाही तिरोडा, धादरी, उमरी, सरांडी, सालेबर्डी परिसरातील विद्युत मोटार पंप, चोरीच्या घटना गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे देत. कसून चौकशी केली असता तिघांनीही नमूद परिसरातून रात्र दरम्यान विद्युत मोटार पंप चोरी केल्याचे सांगून कबूल केले.
यातील गुन्हेगार जितेंद्र रुपचंद पटले यांचे घर झडतीत एक 3 HP PEW कंपनीचा सबमर्सीबल विद्युत मोटार पपं, एक GM कंपनीची जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं, एक ANGLE कंपनीची जुनी वापरती 1.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं, एक SHARP कंपनीची जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं असा *एकुण 29,000/- रूपयांचा मुद्देमाल मिळूण आला. तो पंचा समक्ष जप्त करण्यात आले. तसेच यातील गुन्हेगार आकाश राधेश्याम पटले याचे घर झडतीत एक 1.5 HP आकाश कंपनीचा विद्युत मोटार पपं, एक जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल विद्युत मोटारपपं, एक TARKO कंपनीची जुनी वापरती 1.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं, एक जुनी वापरती पुसट निळ्या रंगाची कंपनीची नाव नसलेली 1.5 HP चो सबमरसिबल विद्युत मोटार पंप, मोटार पंप चोरी करण्याकरिता गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस क्र. एम.एच 40 एस-2912 असा किमती 87,000/- रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला. तो पंचा समक्ष जप्त करण्यात आले. अश्या एकूण 8 सबमर्सिबल विद्युत मोटार पंप व गुन्ह्यात वापरलेली मो.सां. किंमती एकूण- 1,16,000/- (1 लक्ष सोळा हजार/- रु. ) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. विद्युत मोटार पंप चोरीच्या घटना बाबत अभिलेख तपासले असता पोलीस ठाणे तिरोडा येथे अपराध क्रं. 132/2024, व 136/2024, कलम 379 अन्वये विद्युत मोटर चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. तसेच ईतर विद्युत मोटार पंप चोरीच्या घटनेसंबंधाने व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया व गुन्ह्याचे तपास कामाने ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही सराईत चोरटे गुन्हेगारांना गुन्ह्यात जप्त विद्युत मोटार पंप मुद्देमाल सह तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास कायदेशीर प्रक्रिया तिरोडा पोलीस करीत आहेत. सदरची उत्कृष्ठ दर्जेदार कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनात lस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पो.हवा. इंद्रजित बिसेंन, सुजित हलमारे, पो.शि. संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments