गोंदिया, दि. 28 : येत्या 30 जानेवारीला विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून नागपूर विभागातील 5 जिल्ह्यात गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर व भंडारामध्ये मतदानाच्या 48 तास अधी प्रचार संपला आहे. या पाच जिल्ह्यात मतदानाची वेळ सोमवार 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. मतदारांनी मतदान कसे करावे, याबाबतची मतदानाची पध्दती कशी असावी, याबाबत निवडणूक विभागाने सूचना केल्या आहेत.
शिक्षकांनो, असे करा मतदान
एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरी देखील 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घाला. निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडणुकीत उभे असतील आणि त्यापैकी एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर 1 ते 5 असे आकडे घालता येतील. उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या “पसंतीक्रम” दर्शवाचा स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार 2,3,4 इत्यादी आकडे घालून दर्शवा.
मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने पुरविलेले कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील. जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. मतपत्रिकेबरोबर हे स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणतेही पेन, मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नका कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.
उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा. 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या.
कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा तुम्ही घातलेला आहे याची खात्री करून घ्या. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करून घ्या. हा पसंतीक्रम फक्त 1,2,3 इत्यादी आकडयांमध्येच दर्शवा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नका. हे आकडे भारतीय अंकाच्या १, २, ३ इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा 1. 2, 3 अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.
मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका किंवा तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच, तुमच्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नका. यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर v/ किंवा x अशी खुण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम फक्त 1,2,3 इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी तुम्ही उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर 1 हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच तुम्ही तुमची दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवा अथवा दर्शवू नका.
अवैध मतपत्रिका
1 हा आकडा घातलेला नसेल. 1 हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल. 1 हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत संदेह निर्माण होईल अशा प्रकारे घातलेला असेल. एकाच उमेदवारांच्या नावासमोर 1 आणि त्याबरोबर 2,3 इत्यादी आकडे देखील घातलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल. मतदाराची ओळखपटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल, आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल, तर अशी मतपत्रिका अवैध ठरेल.
00000