गोंदिया : पशुखाद्यातून विषबाधा होऊन 4 जनावर दगावल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे उघडकीस आली. चिचगाव येथील पशुपालक देवचंद दसाराम कटरे (45) यांनी पशुखाद्य विकत घेऊन आणले. ते जनावरांना खाऊ घातल्याने विषबाधा झाली.
देवचंद कटरे शेतीसह पशुपालन करतात. त्यांच्याकडे दोन गाय, एक शेळी, एक म्हैस, तीन बैल आहेत. त्याची देखरेख त्यांचे काका देवचंद कटरे करतात. 22 फेब्रुवारी रोजी देवचंद कटरे यांनी जनावरांचे खाद्य सिलेगाव येथील संतोष पांडूरंग राहुलकर (40) यांच्या दुकानातून आणले. ते जनावरांना खाण्यास दिले. ते खाद्यान्न खाल्ल्यानंतर 3 गायी, 1 शेळीचा मृत्यू झाला. तर 1 म्हैस, 3 बैल आजारी आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
विषबाधेने चार जनावर दगावली
RELATED ARTICLES