गोंदिया : परसटोला देवरी वार्ड क्र. 17 येते आज 10.00 वाजे दरम्यान घडलेल्या घटनेमध्ये परसटोला येथील रहिवासी नामे, जितलाल कुंभरे यांचा 3 वर्षीय नामे, साहील जितलाल कुंभरे या मुलाचा घरच्याच विहिरीत पडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची नोंद देवरी पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.
सविस्तर असे की, नामे जीतलाल कुभरे यांची स्वतःची विहीर घराच्या मागच्या भागाला शेतीला लगत खोदण्यात आली होती. या विहिरीला तोंडी बसविण्यात आली नव्हती. या विहिरीवर इलेक्ट्रिक पोल मांडण्यात आले होते. याच विहिरीवरून घराच्या रोजच्या व्यवहारासाठी पाण्याचा उपयोग केला जात होता. हे विहीर जुनाट स्वरूपाची आहे.
आज नामे, साहील कुंभरे या मुलाची आजी पाणी भरायला विहिरीवर गेली असता,आजीच्या मागे मागे तीन वर्षीय साहिल सुद्धा गेला. विहिरीवरून आजीचा पाणी भरून झाल्यावर, डोक्यावर पाण्याने भरलेला घगरा घेऊन आजी घरी यायला निघाली. आजीला वाटलं की, साहील माझ्या मागे मागे घराकडे येत आहे. परंतु, होत्याचे नव्हतं झालं आणि साहील विहिरीवर पाणी खेळता खेळता विहिरीमध्ये पडला. आणि क्षणातच गावातील लोकांची आरडा ओरड सुरू होऊन, दोन तासाच्या आत मध्ये साहिलच्या मृत शरीराला विहिरी बाहेर काढण्यात आला. छवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. पुढील घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.
विहिरीत पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यु
RELATED ARTICLES