राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्व करावे अशी केली अपेक्षा…..
राज ठाकरे यांना पत्रा बाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे….
गोंदिया. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर सर्वसामान्यापासून तर नोकरदारवर्गही आपल्या भावना व्यक्त करीत राजकारणाचा खालावलेल्या स्तरावर चिंता व्यक्त करु लागले आहेत.अशा राजकीय परिस्थितीमुळे राज्यातच नव्हे तर देशातही अराजकता व भितीचे वातावरण तयार होत असल्याच्या भावना युवकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत.अशाच प्रकारची भावना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्दितीय वर्षात शिकणार्या युवकांने रक्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.सध्या रक्ताने लिहिलेले त्या युवकाचे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे.
विशाल ढेबे मुळगाव वडीकाळ्या तालुका अंबड,जिल्हा. जालना असे या विद्यार्थ्याचे नाव असून गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो व्दितीय वर्षात आहे.या विद्यार्थ्याने स्वतःच्या रक्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळावी अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार सोबत अजित पवार गटाने हात मिळवणी केल्यानंतर राजकारणात चाललंय तरी काय असा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला. आणि यातूनच विशाल ढेबे या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रक्ताने मनसे प्रमुख राज ठाकरेंना पत्र लिहित विनंती केली की सध्या महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली असून राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. स्वतःच्या हितासाठी राजकारण करत असून एकमेकावर कुरखोडीचे राजकारण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे शपथविधी घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून महिला सुरक्षित नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करीत आहेत. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत असे असून सुद्धा शासन आपल्या दरबारी या योजनेतून योजना सरकार लोकांपर्यंत नेण्याच्या प्रयत्न करते पण त्यांचे प्रश्न काय आहेत. हे सोडविण्याचा प्रयत्न करीत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी आणि महाराष्ट्राला एक वैभव लाभावे यासाठी फक्त आणि फक्त आपणच पर्याय असल्याचे विशाल ढेबे या विद्यार्थ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.
वैद्यकिय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने राज ठाकरेना लिहिले रक्ताने पत्र
RELATED ARTICLES