गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त जागी 11 महिन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे. यासाठी बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी एमबीबीएस/ बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे थेट मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. सविस्तर माहिती www.gondia.gov.in तसेच www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी कळविले आहे.
वैद्यकीय अधिकारी पदभरती : 15 फेब्रुवारीला मुलाखती
RELATED ARTICLES