Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedशरदचंद्रजी पवार साहेब राजीनामा परत घा

शरदचंद्रजी पवार साहेब राजीनामा परत घा

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांना पाठिंबा

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी काल राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्या मध्ये चांगलेच पडसाद उमटले. यासाठी आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदी आपणच रहावे असा निर्णय एकमताने घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार राजेंद्र जैन हे होते.

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांनी काल अचानक अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला हा निर्णयाची माहिती होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हळहळले दरम्यान जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलावली माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहावे असा सूर सर्वच कार्यकर्यांकडून उमटला त्यानुरूप साहेबांनी घेतलेल्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करून राष्ट्रीय अध्यक्ष पदी आपणच रहावे असा निर्णय घेण्यात आला व तसे निवेदन प्रदेश्याध्यक्ष श्री जयंतजी पाटील यांना पाठविण्यात आला. प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, पूजा सेठ, विशाल शेंडे, बालकृष्ण पटले, किशोर तरोने, केवल बघेले, लोकपाल गहाणे, यशवंत परशूरामकर, अविनाश काशिवार, प्रभाकर दोनोडे, रफिक खान, प्रेमकुमार रहांगडाले, किरणं कुमार पारधी, शंकरलाल टेंभरे, विनीत सहारे, सचिन शेडे, राजकुमार जैन, अखिलेश सेठ, मयूर दरबार, सय्यद इकबाल, मोहन पटले, हेमकृष्ण संग्रामे, टी एम पटले, राजेश तुरकर, पन्नालाल डहारे, योगेश नाकाडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, सुनील पटले, शैलेश वासनिक, दानिश साखरे, नागो बन्सोड, निप्पल बरय्या, आरजू मेश्राम, तुषार ऊके, किशोर ब्राह्मणकर, विनोद चुटे, धनेश्वर तिरेले, यादोराव तरोणे, लक्ष्मण नागपुरे, कांतीकुमार बागडे, विजय रंहागडाले, दीपक कनोजे, रौनक ठाकूर, वामन गेडाम, शरद मिश्रा, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, अरमान जयस्वाल, दर्पण वानखेडे, गौरव शेंडे, नरेंद्र बेलगे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments