गोंदिया : महिलेला शरीर सुखाची मागणी करणार्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आज, 16 मार्च रोजी 2 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला. नितीन देवराज पुरी मुलतानी (25, रा.किन्ही) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला ही 21 ऑक्टोबर 2017 रोजी गावाबाहेरील झुडपी जंगलात शौचास गेली असता आरोपी तिच्या पाठीमागे गेला व शरीर सुखाची मागणी केली. मात्र पीडित महिलेने ही बाब घरी सांगण्याची धमकी दिल्याने आरोपी पळून गेला. दरम्यान पीडिताने ही घटना घरी सांगितले. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन तत्कालीन तपासणी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी आरोपीचे वकील व सरकारी वकीलांच्या युक्तीवादानंतर पुरावे व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीला भादंवि 354 (अ) अन्वये 2 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि भादंवि 354 (क) अन्वये 2 वर्षाचा सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. खटल्यात पीडित पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता वसंतकुमार चुटे यांनी बाजू मांडली. पैरवी कर्मचारी म्हणून रावणवाडीचे पोलिस शिपाई यादोराव कुर्वे यांनी काम पाहिले.
शरीर सुखाची मागणी करणार्यास दोन वर्षाचा कारावास
RELATED ARTICLES