Thursday, October 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedशारिरीक व मानसिक आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक : जिल्हाधिकारी प्रजित नायर

शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक : जिल्हाधिकारी प्रजित नायर

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
गोंदिया : योगसाधना ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.


21 जून आंतराराष्ट्रीय योग दिनानिमीत्त इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर यांची यावेळी प्रमुख्याने उपस्थिती होती. योगासन व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगाभ्यास केल्याने मस्तिष्क व मन संतुलीत राहते. योगासनामुळे शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते तसेच मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने निरंतर योगसाधना करीत राहावे असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आजची जीवनशैली पुर्णपणे बदललेली आहे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपण सर्वांनी जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योगाभ्यास हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते. नियमीत योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगासनामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. यावेळी योग प्रशिक्षक डॉ.नागेश गौतम यांनी प्रात्यक्षिकाद्वारे ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, जंघासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, शषकासन, दंडासन, वक्रासन, वज्रासन, उत्तान मंडूकासन, मक्रासन, भूजंगासन, शलभासन, कंध्रासन (सेतू बंधासन), उत्तान पादासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शवासन आदी योगासने तसेच कपालभाती, नाडी शोधन (अनुलोम विलोम), शीतली, भ्रामरी इत्यादी प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतले व योगासनाचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाद्वारे विविध प्रजातीचे नि:शुल्क वृक्ष रोपटे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी नि:शुल्क शुगर व ब्लड प्रेशर (बीपी) तपासणीचा स्टॉल लावण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, योग मित्र मंडळ, पालावरची शाळा, पोलीस विभाग, नगर परिषद गोंदिया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुण नशिने यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments