Thursday, July 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प. स. वर मोर्चा

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प. स. वर मोर्चा

गोंदिया : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक)च्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी अर्जुनी मोर पंचायत समिती वर मोर्चा निदर्शने आंदोलन करून गैर कायदेशीर रित्या बडजबरीने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली आयटक चे राज्य सचिव मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, युनियन जिल्हा सचिव करुणा गणवीर, सहसचिव गीता नागोशे, उपाध्यक्ष धन्नू उईके, मंगला ठाकरे व शिंधु शहारे शहारे यांचे नेतृत्वात झालेल्या आंदोलनाच्या झालेल्या आंदोलनाच्या शष्टमंडळाने गट शिक्षण अधिकारी श्री मांढरे यांना निवेदन सादर करून अर्जुनी मोर. येथील बरडटोली जी. प. शाळाची सुनिता दामले व गौरनगर येथील विष्णू मिस्त्री यांना मुख्याध्यापिका व व्यवस्थापन समितीने नियमाचे पालन न करता बडजबरीने कामावरून कमी केले आहे या बाबत तक्रार करून सुद्धा गटशिक्षणाधिकारी या कडे दुर्लक्ष करत या नियमबाह्य कारवाईला सहकार्य करत आहेत तसेच कर्मचाऱ्याकडून परिचराची संपूर्ण कामे करवून घेणे, संपूर्ण शाळा परिसराची, वर्ग खोल्याची, स्वच्छता गृहाची व इतर कामाची सफाई करवून घेणे व न केल्यास कामावरून बंद करण्याची धमकी मुख्याध्यापका कडून देण्यात येते या देण्यात येते या नियमबाह्य बाबीवर त्वरित आडा घालण्याची मागणी करण्यात आली शिक्षणअधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक घेऊन बंद केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर शामावून घेणे व इतर प्रश्नावर योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. या आंदोलनात प्रामुख्याने शुषमा दामले (नगर सेविका ), कौशल खोडकर, जीवन पुणेकर,विजया ठाकरे, दीपिका बन्सोड, तारा कोवे, प्रभा खोटेले, भास्कर राजगडे इत्यादी कामगार हजर होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments