Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedशासकीय तंत्रनिकेतन गोंदियाला राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेचे मानांकन प्राप्त

शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाला राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेचे मानांकन प्राप्त

तीन पदविका अभ्यासक्रमांना तीन वर्षांसाठी नॅशनल बोर्ड आॅफ अ‍ॅक्रेडिटेशनचा दर्जा
गोंदिया : शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथील तीन अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड आॅफ अ‍ॅक्रेडिटेशन (ठइअ), नवी दिल्ली यांचे तीन वर्षांसाठी मानाकन प्राप्त झालेले आहे. वॉशिंग्टन एकॉर्ड (मान्यता संस्थांचे जागतिक संघ) अंतर्गत नियमाच्या आधारित असलेले हे मानांकन असून यूएस, यूके, कॅनडा, आॅस्ट्रेलियासह 29 देशांच्या बरोबरीने हे मानांकन देण्यात आलेले आहे. हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे अलीकडे प्राप्त झालेल्या उत्कृष्ट संस्था मानांकनच्या वरचे मानांकन आहे. 2022-2025 या कालावधीत यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञानातील या अभ्यासक्रमाना ठइअ मानांकन प्राप्त झालेले आहे. ही नॅशनल बोर्ड आॅफ अ‍ॅक्रेडिटेशन मान्यता 9 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान देशातील सर्वोच्च विद्यापीठे/संस्थांच्या चार वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने केलेल्या तपासणीच्या आधारे देण्यात आले. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे प्राचार्य प्रा.(डॉ.) सी.डी.गोळघाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. आर.एन.निबुदे, विभाग प्रमुख माहिती तंत्रज्ञान, डॉ. पी.एस.शर्मा, विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी, प्रा. जी.एच.डाहोले, विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी, डॉ. जी.व्ही.गोतमारे, मुख्य ठइअ समन्वयक, प्रा. एन.एन.निकोडे, समन्वयक, विज्ञान आणि मानविकी, डॉ. हेमा भुसारी, ळढड, प्रा. स्वप्नील अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया ही महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील प्रमुख संस्थांपैकी एक असुन सन 2009 मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला संस्थेची विध्यार्थी क्षमता 240 होती. सध्या संस्थेची वार्षिक विध्यार्थी क्षमता 360 आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यावसायिक मानकांसाठी सक्षम आणि वचनबद्ध असलेले प्रख्यात अभियंते विकसित करणे हे गोंदिया शासकीय तंत्रनिकेतनचे उद्दिष्ट आहे. संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस यंत्र अभियांत्रिकी, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. तदनंतर 2014 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. संस्थेतर्फे राबविले जाणाºया अभ्यासक्रमांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेतर्फे ठोस प्रयत्न केले जात होते. शैक्षणिक गुणवत्तेची उच्च पातळी राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी नियमित शैक्षणिक अंकेक्षण केले जाते. शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया ही पदविका श्रेणीमध्ये कामगिरी करणाºया देशातील मोजक्या संस्थांपैकी एक आहे. संस्थेने तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, डॉ.विनोद मोहितकर, संचालक टरइळए, मुंबई आणि डॉ. एम.बी.डायगव्हाणे सहसंचालक, नागपूर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथील प्राध्यापक व कर्मचारी यांनी एनबीए गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments