आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी
गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. नुकतेच जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी तहसीलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह गोंदिया तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून लवकरात लवकर पंचनामा करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. नुकसानी चा दौरा करून आमदार विनोद अग्रवाल यांनी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भातशेतीसह इतर पिके व जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकतेने विभागीय आयुक्त नागपूर यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी
RELATED ARTICLES