Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedशिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

आमगाव : येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका शिपायाने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्याचा प्रयत्न केला. राकेश बोरकर असे शिपायाचे नाव आहे. या प्रकाराने तहसील कार्यालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार आज 27 फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आला.
येथील तहसील कार्यालयात मागील ऑगस्ट महिन्यांपासून राकेश शिपाई पदावर कार्यरत आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे मागील सहा महिन्यांपासून राकेशचे वेतन झालेले नाही. सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने राकेश आर्थिक विवंचनेत आहे. यातच त्याच्यावर झालेली उधारी मागणार्‍यांचा सतत तगादा, उधारीची रक्कम वाढल्याने कोणीही उधार देण्यास तयार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न राकेश समोर निर्माण झाला आहे. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा याच विवंचनेत राकेशने होता. परिणामी आर्थिक विवंचनेत राकेशने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. दरम्यान तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येथे विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी समजूत काढून राकेशला खाली उतरविले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments