Friday, July 12, 2024
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या हितासाठी खा.प्रफुल पटेल सदा अग्रेसर : राजेंद्र जैन

शेतकऱ्यांच्या हितासाठी खा.प्रफुल पटेल सदा अग्रेसर : राजेंद्र जैन

गोंदिया : आगामी काळात होणाऱ्या तालुका खरेदी विक्रीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वशक्ती निशी उतरणार याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कृषी उत्पन्न बाजार समिती हि संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या खरेदी विक्री करीता आहे. शेतकऱ्यांशी निगडित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी या संस्थेवर पक्ष समर्थित पॅनल चा झेंडा रोवणे आवश्यक आहे, त्यानुसंगाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य उमेदवारांची निवड व सभासदाच्या भेटीगाठी च्या कामालाही लागावे अश्या सूचना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केली.
गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक जनसंपर्क कार्यालय, गोरेगांव येथे माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री रविकांत बोपचे, श्री केवल बघेले, श्री विशाल शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. माजी आमदार श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी नेहमी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना बोनस व शेतकरी यांच्यावर आलेल्या नैसर्गिक संकटात सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम श्री पटेल यांनी केले. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनलला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केली.
यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले, रविकांत बोपचे, विशाल शेंडे, कल्पना बहेकार, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, रुस्तम येडे, सुरेंद्र रहांगडाले, महेंद्र चौधरी, रामभाऊ हरिणखेडे, विनोद रहांगडाले, परशुराम वंजारी, भूपेश गौतम, खुशाल वैद्य, अनिता तुरकर, श्रदाताई रहांगडाले, ललिता पुंडे, छोटीताई रहांगडाले, उषाताई रामटेके, कल्पना शेवटे, रामेश्वरी रहांगडाले, वैशाली तुरकर, मनीषा बोपचे, टी. के. कटरे, रामभाऊ आगडे, प्रफुल शेंडे, रामेश्वर पटले, कुवरलाल जांभुळकर, धनराज दहीकर, तुकाराम गौतम, डॉ उमेश ठाकरे, अनुराज सरोजकर, नरेश कोहळे, प्रतीक पारधी, टेकचंद कटरे, संजय आमदे, रविकांत लांजेवार, अनिल मडावी, तेजराम बिसने, प्रमोद जैन, कमलेश बारेवार, गिरिधारी कटरे, गिरिधारी बोपचे, गेंदलाल गौतम, भोजराज चौहान, बबलू वंजारी, रवींद्र सेऊतकर, नामदेव सतीभस्की, व्यंकट राऊत, शिवशंकर ठाकरे, धर्मेंद्र तिरपुडे, कामराज रहांगडाले, रामेश्वर बघेले, शिवा ठाकरे, तेजराम बिसने, टेकचंद कटरे सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments