अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव येथील घटना
गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव येथे शेत जमिनीच्या वादावरून दिनांक 14 फेब्रुवारी च्या सकाळी साडेनऊच्या सुमारास एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे यातील मृतक विलास रामदास मस्के वय 41 वर्ष राहणार शिरोली महागाव हे नवेगाव बांध येथे पोलीस दलातील c60 मध्ये पोलीस म्हणून कार्यरत होते तर त्यांचे वडील फिर्यादी रामदास केशव मस्के वय 72 वर्ष राहणार शिरोली महागाव हे गंभीर जखमी असून अर्जुनी मोर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत सविस्तर वृत्त असे की महागाव शेतशिवारात दिनांक 14 फेब्रुवारी च्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी रामदास मस्के व त्यांचा मुलगा मृतक विलास हे अतिक्रमण केलेले गट क्रमांक 10 55 या जागेत मजुरांसह उन्हाळी धानाचा रोवना करीत असताना आरोपी अभिषेकसिंह सत्यपाल सिंह पवार वय अंदाजे 39 वर्ष राहणार महागाव जयंतकुमार सिंह सितारामसिंह पवार वय 72 वर्ष राहणार हेटी खामकूरा सुमितसिंह उदयसिंह पवार वय 40 वर्ष राहणार महागाव वैष्णव प्रताप सिंह उर्फ सोनू इंद्रपाल पवार वय 36 वर्ष राहणार महागाव राकेश नरेंद्र सिंह पवार वय 43 वर्ष राहणार पळसगाव घाटी जितेंद्र चैनलाल सिंह सोनग्रे वय 25 वर्ष राहणार महागाव व इतर अनोळखी चार ते पाच इसम यांनी गैर कायद्याचे मंडळी जमवून तलवार व लोखंडी राड घेऊन फिर्यादी रामदास यांच्या शेतावर येऊन तुझ्या बापाची शेती आहे का तुम्ही रोवना का करत्या आता यांना सोडायचे नाही असे बोलून विलास यांच्या डोक्यावर तलवारीने व लोखंडी राजने मारहाण करून रक्तबंबाळ करून त्यास जीवे ठार मारले तर फिर्यादी रामदास यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याला पाठीला व कमरेला गंभीर दुखापत केल्याने फिर्यादीच्या ग्रामीण रुग्णालय येथे उपचारादरम्यान दिलेल्या जबाबदावरून व डॉक्टर अहवालावरून आरोपिताविरुद्ध कलम 302 , 326,504 ,506 ,143,147,148 ,149 भारतीय दंडविधान अनुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे पुढील तपास अर्जुनी भोर पोलीस करीत आहेत.
शेत जमिनीच्या वादातून एकाचा खून तर एक गंभीर जखमी
RELATED ARTICLES