Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedश्री हनुमान जन्मोत्सव आजपासून

श्री हनुमान जन्मोत्सव आजपासून

गोंदिया : स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील सिध्द हनुमान महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीने ‘श्री हनुमान जन्मोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन ५ एप्रिलपासून आयोजित आहेत.
५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भजन संध्या, रात्री ११.३० वाजता भव्य आतिशबाजी, हनुमान चालिसा पाठ व आरती तर ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता हनुमान रूद्रअभिषेक, शृंगार व आरती, सकाळी १० वाजता हवन पुजन व आरती, सायकाळी ६.३० वाजता महाआरती व त्यानंतर सायंकाळी ७ वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिध्द हनुमान महाराज मंदिर सेवा समिती, शास्त्री वॉर्डच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments