उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जि.प.सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांचे निवेदन
गोंदिया : तालुक्यातर्गत येत असलेल्या संग्रामपुर मध्यम प्रकल्प व हरि तलाव या दोन्ही जलाशयाची दुरुस्तीची कामे व अत्यंत जिर्ण अवस्थेत असलेल्या कालव्याची दुरुस्ती व इतर बांधकामे करण्याची मागणी एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे जलाशय म्हणजे संग्रामपुर मध्यम प्रकल्प व हरि तलाव ही दोन्ही जलाशये आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया अंतर्गत संग्रामपुर मध्यम प्रकल्प व हरि तलाव ही जलाशये येतात. दोन्ही जलाशयास वनविभागाची जागा लागलेली असून नैसर्गिक रित्या जंगलातील येणाऱ्या पावसाळ्यामुळे दोन्ही जलाशयात पाणी भरतो या पाण्यामुळे शेतकऱ्यांना खरिपच्या शेतीस शेवटी लागणारे पाणी मिळते ज्यामुळे खरिप शेती पुर्ण होते. व उरलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात रब्बी करिता शेतीला पाणी दिला जातो. दोन्ही जलाशयाचे कालवे अत्यंत जिर्ण अवस्थेत असल्याने जलाशयातुन सोडण्यात पाणी पैकी अर्धा पाणी शेती पर्यंत जातो व अर्धा पाणी वाया जातो. जर या दोन्ही कालव्यांची दुरुस्ती झाली तर रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतीत रब्बी दिली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना दोन दा उत्पन्न घेता येईल. पाण्याचा साठा वाढविण्यासाठी दोन्ही जलाशयांची गाढ काढने, कालव्यांना नविन लाईनिंग, तलावाची पाळ,, नविन गेट, रफ्टा या सर्व ठिकानी नविन बांधकाम करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. व लवकरच सदर कामांना मंजूरी मिळुन सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन सुद्धा यावेळी अजितदादा पवार यांनी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांना दिले.
संग्रामपुर व हरि तलाव जलाशय व जीर्णावस्थेत असलेल्या कालवा दुरुस्तीची मागणी
RELATED ARTICLES