गोंदिया : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे 16 फेब्रुवारी रोजी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्य दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे भीषण अपघात झाला.
यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड कडे हे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शन ला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली दरम्यान कालव्यामध्ये मध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून या तिन्ही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात, तीन ठार तर तीन जख्मी
RELATED ARTICLES