Thursday, October 10, 2024
Google search engine
HomeUncategorizedसावधान! दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका!

सावधान! दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बनावट मिठाईचा धोका!

गोंदिया. देशात सणासुदीची लगबग सुरु आहे.दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाईचा खप अनेक पटींनी वाढतो.सणासुदीत मिठाईचा खप वाढल्याने खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोकाही लक्षणीय वाढतो. या पाश्र्वभूमीवर येत्या हंगामात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.दुकानदारांना या सणासुदीच्या काळात दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.देशभरात ४००० राज्यस्तरीय अधिकाèयांना दुकानदारांवर निगरानी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र गोंदिया जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती असून मिठाईच्या एकाही दुकानात प्राधिकरणाच्या निर्देशाचे पालन केले जात असल्याचे चित्र नाही.उलठ एकेकाळी एका दुकानाने सुरवात करणारे परराज्यातील मिठाईवाल्यांनी आज शहराच्या प्रत्येक चौकात दुकाने सुरु केल्यानेे खरंच यांच्या दुकानातील मिठाई मानकानुसार योग्य आहे काय अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
या मिठाई दुकानावर गोंदियाच्या अन्न औषध विभागाच्या अधिकार्यांनी कधी कारवाई करुन नागरिकांना बनावट मिठाई खाण्यापासून परावृत्त केल्याचेही चित्र नाही.उलट दिवाळी आली की एकदोन कारवाईचा फार्स करुन आम्ही कारवाई करीत असल्याचा देखावा करुन दिवाळीची मिठाई आपल्या खिशात भरूनच जात असल्याची चर्चा आहे.दिवाळीच्या काळात परराज्यातून आलेल्या मिठाईवाल्याच्या दुकानातून लाख रुपयाचे मिठाई पॅकेट दरवर्षी कारवाई न करण्याकरीता घेतले जात असल्याची चर्चा याच मिठाई व्यवसायिकात एैकावयास मिळत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवाळी किंवा सणासुदीच्या काळात बाजारात विकल्या जाणाèया मिठाईत मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं दिसून येते.भेसळ करताना खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च मिसळला जातो.स्टार्चचे जास्त प्रमाण मूत्रपिंड आणि यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहे.कधी-कधी मिठाईमध्ये फॉर्मेलिनचाही वापर केला जातो. फॉर्मेलिन वापर सामान्यतः मृतदेह दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो.मिठाईमध्ये फॉर्मेलिन सारखे केमिकल वापरणे अत्यंत हानिकारक असून ते घातक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे.या साहित्याचा वापर करुन मिठाई विकणार्या दुकानदारांनी काही राजकीय पाठबळ असलेल्या लोकांना हाताशी धरुन आपला हा काळा धंदा चालवून नागरिकांचे आरोग्य बिघडवण्याचे काम सुरु केले आहे. या मिठाईच्या बाबतीत खरेदी करताना घ्यायची आणखी एक खबरदारी म्हणजे त्यावर लावण्यात येणारा हा वर्ख चांदीचा असल्याचा दावा करण्यात येतो. हा दावा पूर्णपणे खोटा असतो असे म्हणता येणार नाही. तरी चांदीचा सध्या असलेला भाव पाहता सर्रास चांदी वापरली जाते का? हा प्रश्न मनात नक्की उपस्थित होतो. चांदी ऐवजी अल्युमिनियम या धातूचा पातळ पत्रा जो चांदीच्या वर्खाप्रमाणे पातळ बनतो तो वापरला जातो. चरबीच्या दोन थरांमध्ये चांदी ऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा ठेवून त्यावर धोपटले जाते व अति पातळ पत्रा बनविण्यात येतो. हीसुद्धा भेसळच आहे. अ‍ॅल्युमिनियमचे बारीक कण आतड्यांना चिकटून राहतात. त्याचे विघटन होत नाही आणि सातत्याने अ‍ॅल्युमिनियम पोटात गेल्यास अल्सर आणि नंतर कॅन्सरसारखे दुर्धर आजार उद्भवतात. चांदीच्या वर्ख ओळखण्यासाठी जर चिमटीमध्ये वर्ख धरला आणि कुस्करला तर त्याची पावडर होते, तर अल्युमिनियमचा पातळ पत्रा चिमटीमध्ये धरला आणि कुस्करला तर त्याची टणक गोळी बनते.
मिठाईवर खूप वेळा केशराचे मोठे तंतू लावलेले दिसतात. मक्याच्या कणसाचे तंतू मेटॅनिल यलो या अखाद्य रंगामध्ये बुडवून ते वाळवून वापरले जातात. मेटॅनिल यलोसारख्या अखाद्य रंगामुळे शरीरास अपाय होतो, अपंगत्व येते. याबरोबरच वनस्पती तेल, मिल्क पावडर आणि साखरेचे मिश्रण यापासून बनवला गेलेला, पूर्णपणे नकली मावा बाजारात स्वस्तात उपलब्ध होतो.अशा संभाव्य धोक्यांमुळे जागरूकपणे येत्या दिवाळीत नागरिकांनी खरेदी करतांना काळजी घेणे आवश्यक असून सोबतच दुकानदाराकडे बिल मागण्यास मात्र विसरु नये जेणेकरुन कुणालाही या मिठाईपासून विषबाधा झाल्यास संबधित दुकानदारावर पोलीस विभाग किंवा अन्न औषध विभागाच्यावतीने कारवाई करण्यास सुकर होऊ शकेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments