Thursday, October 24, 2024
Google search engine
HomeUncategorizedसिकलसेल अनुवंशिक आजार आहे : डॉ सचिन उईके

सिकलसेल अनुवंशिक आजार आहे : डॉ सचिन उईके

गोंदिया : बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात 19 जून रोजी जागतिक सिकल सेल दिना निमित्त मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या कॅम्प चे उदघाटन बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिनकुमार उइके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर विशेष अतिथी म्हणून सिकल सेल जिल्हा समनव्यविका सपना खंडाईत
उपस्थित होत्या.
सिकल सेल मोफत रोग निदान शिबिर बाबत प्रास्ताविक समुपदेशिका श्रीमती नितु फुले यांनी केले. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध बालरोग विशेष तज्ञा व वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कुमार उइके यांनी आवाहन केले की सिकल सेल या आजार बाबत आज ही अनेक गैरसमज आहेत, परंतु सिकल सेल हा एक आनुवंशिक आजार आहे. त्यामुळे विवाह जुळवताना सिकल रक्त तपासणी स्क्रिनिंग करूनच लग्न जुळवावे बाई गंगाबाई येथे सिकल बालकांना मोफत उपचार करण्यात येतो
या वेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की गर्भवतींनी सिकल सेल बाबत रक्त तपासणी स्क्रिनिंग अनिवार्य करावी डॉक्टरांनी दिलेला सल्ला व औषधेउपचार व्यवस्थित घ्यावा जेणेकरून सिकल आजार मुळे गर्भावस्थेत गुंतागुंत होणार नाही. युवकयुवतींनी आपले सिकल स्टेटस तपासून बघावे म्हणजे सिकल मुक्त गोंदियाचा संकल्प घेता येईल.
या वेळी जिल्हा परिषदेच्या सपना खंडाईत यांनी सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम या बाबत सविस्तार महिती उपस्थित रुग्ण व पालक यांना दिली समुपदेशक नितु फुले व प्रयोगशाळा तंत्रद्न श्री संतोष नायकाने यांनी मोफत सिकल सेल रक्त तपासणी साठी सहकार्य केले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साक्षी कुमारी यांनी व्यक्त केले बिजिडब्लु च्या ओपीडी मधील रुग्णाला सिकल सेल आजराबाबत चे माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments