गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने 08 मे 2023 रोजी, सकाळी 10:00 वा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे गोंदिया तालुका स्तरावर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान, किसान सम्मान निधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुद्रा लोन, जननी सुरक्षा योजना आदीचा आढावा घेण्यात येणार आहे. सदर बैठकीला संबंधित अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी खासदार यांचा जनता दरबार
RELATED ARTICLES