गोंदिया : हर मन के मित, शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेलजी यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजेत या उद्देशाने गोंदिया शिक्षण संस्था या नावाने शैक्षणिक रोपटे लावून गोंदिया व भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे काम केले. या शिक्षण संस्थेचे संगोपन करण्याचे काम खा. श्री प्रफुल पटेल व संस्थेच्या अध्यक्षा सौ.वर्षाताई पटेल यांनी समर्थपणे सांभाळले आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित जी.ई.एस हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय दासगाव येथे 27 ते 29 डिसेंबर असे तीन दिवसीय चाललेल्या शालेय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंद तुरकर तर प्रमुख पाहुणे श्री केतन तुरकर, राणूताई तुरकर, आनंदाताई वाढिवा, मंजूताई डोंगरे, हिरामण डहाट प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. संधीचे सोने करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची आहे. यावेळी आयोजित विज्ञान प्रदर्शनीचे निरीक्षण श्री जैन यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री दिनेश तुरकर, अंचल गिरी, तुलशिताई बोहने, छायाताई तुरकर, पुरुषोत्तम डोहरे, गीताताई उके, कादर शेख, भिवराव हरिणखेडे, झनकारसिह लील्हारे, परसराम पाचे, भीमप्रसाद कोहळे, सुरजलाल बरैया, रानूताई बरैया, आरजू मेश्राम, रौनक ठाकूर, डी एल पारधी, बसेने सर, कोमल रहांगडले सहीत पालक वर्ग, नागरिक व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.