Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedस्वाभिमान शून्य ठेवून जीवन जगण्यापेक्षा श्रमाच्या कष्टातून आपले अमूल्य जीवन फुलवावे :...

स्वाभिमान शून्य ठेवून जीवन जगण्यापेक्षा श्रमाच्या कष्टातून आपले अमूल्य जीवन फुलवावे : आ.चंद्रिकापुरे

गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हा अत्यंत संघर्षमय होता. शोषित पीडित, दिन दलित समाज हेच माझे कुटुंब परिवार आहे, असे समजून त्यांच्या उद्धारासाठी आपले जिवन सर्मपित केले. देशातील सर्व समाजाला संविधानाच्या चौकटीत आणून समान अधिकार, आरक्षण देऊन देश एकसंघ ठेवला. प्रत्येकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतर% डॉ. बाबासाहेबांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने महामानव यांचे विचार आणि आचार अंगीकार करता येत नसतील तर समाजाची प्रसंगी व्यक्तीची प्रगती ही शून्य होते. परिस्थितीवर मात करून आपल्या समाजातील मुल ही प्रचंड ताकदीने शिक्षण घेऊन नोकरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करीत आहेत. स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी आयुष्यात मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे स्वाभिमान शून्य ठेऊन जगण्यापेक्षा र्शमाच्या कष्टातुन आपले अमूल्य जिवन फुलवावे असे मत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
भिमशक्ती मंडळ, रमाबाई भिमज्योती महिला मंडळ राजोली/ भरनोली च्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाशिल बौध्द विहार राजोली येथे आयोजित गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ५ मे रोजी उदघाटक म्हणुन आ.चंद्रिकापुरे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी होते. ध्वजारोहक म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती मा.इंजि यशवंत गणवीर, प्रमुख वक्ते म्हणुन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, सरपंच जयश्री मस्के, उपसरपंच सदानंद टेकाम, नगरपंचायत गटनेता दाणेश साखरे, मुन्नाभाई नंदागवळी साहित्यिक, अशोक इंदुलकर माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ.चंद्रशेखर बांबोंडे, राजू मेर्शाम, संजय रामटेके, रेखा पालीवाल, मेर्शाम मॅडम काँग्रेस, चरणदास कराडे, योगेश टेंभुर्णे, नेताजी सुकारे, शॉपिंग खा पठाण, गोपाल मस्के, रामलाल कुंभारे,देवा कोरेती प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चारही महापुरुषांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकुन विस्तृत मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा येथुन धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रज्ञाशिल बुध्द विहारात महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले व सर्व महामानवांना अभिवादन करण्यात आले. विहारात भंते सोमं यांचे वाणीतुन बुध्द वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. अनावरण सोहळ्याचे प्रास्ताविक नरेश मेर्शाम तर संचालन संजय कांबळे यानी तर उपस्थितांचे आभार सिध्दार्थ डोंगरे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments