Saturday, September 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedहत्तीचा देवरी शहरात धुडगूस; नागरिक व शेतकर्यात भितीचे वाचावरण

हत्तीचा देवरी शहरात धुडगूस; नागरिक व शेतकर्यात भितीचे वाचावरण

गोंदिया : जिल्ह्यातील मोरगाव/अर्जुनी तालुक्याला गेले वर्ष भरापासुन हत्तींनं वेढा दिला आहे. हत्तीनं या गावात धुडगूस घालत अनेक घर उधवस्त करत शेतकर्यांची शेती पिकांना नेस्त नाबुद केले आहे. यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी हतबल झाले आहेत. आता हेच हत्ती देवरी तालुक्यातील जेठभावडा या ठिकानी दिसायला लागले असुन काल रात्री देवरी शहराला लागुन असलेल्या केशोरी तलाव परिसरात नागरीकांनी पाहिले असल्याचे बोलले जात आहे. तलाव शेजारी घरे व शेती असल्याने या परिसरात हत्तीचा वावर दिसल्याने शेतीचे व घराचे नुकसान तर होनार नाही ना ही भीती देवरी शहरातील नागरीकांत कायम आहे .
ऐक वर्षा अगोदर गडचिरोली जिल्ह्यातुन मोरगाव/अर्जुनी तालुक्यात पहिल्यांदा हत्तीचे आगमन झाले. कर्नाटक राज्यातून गडचिरोली मध्ये दाखल झालेल्या हे हत्ती हळू -हळु संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात फिरायला लागले. आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी बनले. या हत्तींना रोखण्यासाठी शासनाने अनेक शकलं लढवल्या. पण यात अपयश आलं. आता हत्तींचा देवरी तालुक्यातील जेडभावडा गावात व तिथुन देवरी शहराला लागुन असलेल्या केशोरी तलावापर्यंत येऊन पोहोचले आहेत. वनविभागाने हत्तीना पळविन्यासाठी योग्य तो पर्याय निवळला नाही तर नागरीकांना हत्तीचा त्रास सहन करावा लागनार आहे.
चाळिस ते पन्नास हत्तीचा कळप आनी काही छोटे हत्ती आहेत. आता नागरकानीं पावसाळी शेती केली आहे. पंरतु हत्तीचे प्रवेशाने आता पावसाळी शेतीही हाती लागनार नसल्याने विवंचनेत येथील शेतकरी वर्ग आहे. रात्री-अपरात्री देवरी – शेडेपार मार्गे प्रवास करायला लोक घाबरत आहेत. कारण हत्तीचा कळप रस्त्यावरुन फिरत असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी सध्या भात लागवट केली असुन भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान या हत्तीमुळे होनार तर नाही ना..? यामुळे या भागातून हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी देवरी शहरातील नागरीक व शेतकरी करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments