62 हजारांचा मुद्देमाल जप्त : विशेष पथकाची कारवाई
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोरगाव (वडेगाव) शेतशिवारात आणि गायखुरी नाला भागात चालू असलेल्या मोहफुलाच्या हातभट्टीवर 8 फेब्रुवारी रोजी पहाटे विशेष पथकाने धाड टाकली. यावेळी 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत चालणाºया अवैध धंद्यांवर तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे व अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाºयांवर कारवाईचे निर्देश देवून आदेशित केले होते. त्या अनुषंगाने 8 फेब्रुवारी रोजी पहाटे विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तिरोडा तालुक्यातील बोरगाव (वडेगाव) शेतशिवारात व गायखुरी नाला भागात मोहफुलाची हातभट्टी लावून दारूची अवैधरित्या निर्मिती करणाºया दोन ठिकाणी धाड टाकली. यावेळी 30 लिटर मोहफुलाची दारू, 500 किलो सडवा मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण 62 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपी संजय रेखलाल टेंभेकर (52) रा. वडेगाव व एक 40 वर्षिय महिलेविरूद्ध तिरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, शैलेश निनावे, दयाराम घरत, हरीकृष्णा राव यांनी केली.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219