Saturday, September 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedहिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन शेळ््या ठार

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन शेळ््या ठार

गडपेंढरी येथील घटना
भंडारा : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्लात तीन शेळ्या ठार तर दोन जखमी झाल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया गडपेंढरी परिसरात 26 जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली.
गडपेंढरी गावालगत टेकडी व पाण्याचा ओढा असल्याने येथे वन्यप्राण्यांच्या वावर असतो. तर गावातील शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यामुळे या हिंस्त्र प्राण्यांना पशुपालकांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांची सहज शिकार करता येत असल्याने त्यांची मजल गावापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, 26 जानेवारीच्या रात्री पशुपालक भालचंद्र मोडकू गायधने यांच्या गोठ्यात हिंस्त्र प्राण्यांनी शिरून तीन शेळ्या ठार केल्या. तर लगतच्या गोमा मुका कावळे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्यांवरही हल्ला चढविला. शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून गोमा कावळे हे जागे होऊन गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट सदृश्य प्राणी पडताना दिसून आला. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र सहाय्यक जे.एन. बघेल यांनी वनरक्षक कृष्णा सानप यांच्यासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोहरा येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून त्यांना जमिनीत गाढण्यात आले. मागील काही महिन्यात ही तिसरी घटना असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर नुकसानग्रस्त पशुपालकांना आर्थिक मदत व हिंस्त्र प्राण्यांचा गावात शिरकाव होणार नाही याकरिता बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments