गोंदिया : तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भांडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जी.प.गोंदिया अध्यक्ष पंकज रहांगडाले, यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हिरापूर येथे ३४२ लक्ष, संभाटोली येथे १६.०० लक्ष, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वर्गखोली ११.०० लक्ष रुपये, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत चावडी बांधकाम ३.०० लक्ष रुपये, स्वछ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापण ९.०० लक्ष रुपये, १५ व्या वित्त आयोगातून नाली बांधकाम २.०० लक्ष, मातामाय देवस्थान गट्टू लावणे ३.०० लक्ष रुपये, सौर उर्जा हातपंप बसविणे ५.०० लक्ष रुपये, नरेगा अंतर्गत नाली व रस्ता बांधकाम एकूण २०.३० लक्ष, या कामांचा समावेश असून २५१५ योजना, आमदार निधी व नरेगा अंतर्गत एकूण ७९.८१ लक्ष रुपये बांधकाम पूर्ण कामांचे लोकार्पण करण्यात आले. या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला प्रामुख्याने जी.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत, प.स.सभापती मनोज बोपचे, प.स.सदस्या शीतल बिसेन , सुरेंद्र बिसेन, सरपंच विजय बिसेन, उपसरपंच दिलीप बोपचे,सतीश राहांगडाले,सदस्य सलीम भाई पठान, रीता बोपचे, स्मिता टेंभरे, धुर्वराज टेभरे, धुर्वराज पटले, छबिलाल चौधरी व गावातील मान्यवर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
हिरापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
RELATED ARTICLES