गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ’सबका साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर आधारित अर्थसंकल्प आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन जी यांनी सादर केले, असे मत माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केले. युवाशक्ति, नारीशक्ति, शेतकरी आणि गरीब या चार वर्गांच्या उत्थानासाठी मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून कायम काम करत आली आहे. या बजेटमध्ये देखील या चारही वर्गांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यवस्था केलेली आहे. महामार्ग, मेट्रो, वंदे भारत, एअरलाईन्स अशा इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी विशेष तरतूद करत असतानाच 1 कोटी घरांना 300 युनिट सोलार वीज मोफत देण्याची व इलेक्ट्रिक वाहनाना चालना देण्यासाठी तरतूद केलेली आहे. विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणारे हे सरकार आहे, असेही ते म्हणाले. येत्या काही महिन्यात देशात निवडणुका आहेत, या अनुषंगाने आज अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अंतरिम बजेट सादर केले. पण जुलै 2024 मध्ये पुन्हा मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच पूर्ण बजेट सादर करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-डॉ. परिणय फुके