गोंदिया. आजचा दिवस अर्जुनी-मोर. तालुका वासियांसाठी अत्यंत दु:खद असुन तालुक्यातील तिन गावातील तिन युवकांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवसी मृत्यु झाल्याने अर्जुनी-मोर. तालुका हादरुन गेला आहे.तर मृतकांचे परिवांरावर शोककळा पसरली आहे.या घटना ८ जानेवारी २०२६ रोजी घडल्या आहेत.
या दु:खद घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आजचा दिवस ता.८ जानेवारी अर्जुनी-मोर. तालुकावासिंयासाठी अत्यंत दुर्देवी ठरला आहे.तालुक्यातील ताडगांव येथील संदिप वसंत नाकाडे या ४२ वर्षीय इसमाने अर्जुनी-मोर. रेल्वे स्टेशन परिसरात आठ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास गोंदिया – चंद्रपुर कडे जाणा-या मालवाहू रेल्वे गाडी समोर येवुन आपले जिवन संपविले,संदिप नाकाडे हा विवाहीत युवक अर्जुनी-मोर. येथे कृषी केंद्र चालवीत असल्याची माहिती आहे.त्याचे मृत्युने कुटुंबावर आघात पोहचला असुन ताडगावमधे शोककळा पसरली आहे.दुस-या एका घटनेत अर्जुनी-मोर. तालुक्यातील धाबेटेकडी / आदर्श येथील नंदेश्वर गजानन कापगते या ३५ वर्षीय विवाहीत युवकाचा शेतातील विद्युत डिपी जवळ शाॅक लागुन जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली.या दुर्देवी मृत्युमुळे मृतकाचे कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने त्यांचे परिवारांवर आघात झाला असुन धाबेटेकडी गावात शोककळा पसरली आहे.दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी-मोर. ग्रामीण रुग्णालयात आणले असता.मृतकाचे नातेवाईक, कुटुंबिय यांनी मोठी गर्दी करुन प्रचंड शोकव्यक्त करीत होते.या घटनेचा सखोल तपास अर्जुनी-मोर. पोलीस करीत आहेत.
तिस-या एका घटनेत अर्जुनी-मोर. तालुक्यातील मोरगांव येथील अविवाहित दुर्गेश वामन चौधरी वय २८ वर्षे हा युवक काही कामा निमित्त साकोली तालुक्यातील नातेवाईकाकडे दुचाकीने गेला होता.सात जानेवारी रोजी साकोली तालुक्यातील चारगांव फाट्याजवळ दुपारी चार वाजेच्या दरम्यान ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुर्गेश चौधरी जागीच ठार झाला. अर्जुनी-मोर तालुक्यातील या तिन्ही घटनांमुळे संपुर्ण तालुका हादरुन गेला असुन संपुर्ण तालुक्यासह तिन्ही गावात शोककळा पसरली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका हादरला, एकाने रेल्वेखाली जिवन संपविले, एकाचा विद्युत शाॅक लागुन मृत्यु तर रस्ता अपघातात एकाचा मृत्यु
RELATED ARTICLES






