Saturday, June 7, 2025
Google search engine
HomeUncategorizedअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली निवेदनातून मागणी
गोंदिया : जिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठयांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने आर्थिक मदत करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले. खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात हे निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या प्रमाणात घरे व गुरांची गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हयात धानाचे पिक मोठया प्रमाणावर असुन धान पिकाची नुकसान झालेली आहे. तसेच जिल्हयातील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणून भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत असल्याने धान, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन, सरपंच बाळकृष्ण पटले, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सुरेश हर्षे, माजी समाज कल्याण सभापति पूजा अखिलेश सेठ, जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु ) बावनथडे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले, उपसभापति पंचायत समिति शिवलाल जमरे,शहर अध्यक्ष नानू मुदलियार, माजी पंचायत समिति सदस्य अखिलेश सेठ, माजी उपसभापति पंचायत समिति नीरज उपवंशी, कीर्ती पटले, सरला चिखलोंडे, माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले, पंचायत समिति सदस्य शंकरलाल टेम्भरे, माजी सरपंच नितीन टेम्भरे, पंकज चौधरी, सुनील पटले, लीकेश चिखलोंडे, शिवलाल नेवारे, चुन्नीलाल शहारे, राकेश वर्मा, रौनक ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य संजय चौरे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments