जनतेची शक्तीच मला काम करण्याची प्रेरणा देते : आमदार विनोद अग्रवाल

0
207

मोगर्रा येथे नवे ग्रामपंचायत भवन तसेच 1 कोटी 90 लाखांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज ग्राम मोगर्रा येथे नवीन ग्रामपंचायत भवनासह सुमारे 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विविध विकासकामांची भेट गावाला दिली.विविध लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधित करताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, “मी आमदार नसताना देखील या गावात तुमच्या भेटीला येत होतो. त्या काळात गावाचा विकास कोसो दूर होता. ना रस्ते होते, ना कोणतेही विकासकाम. कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आम्ही मोगर्र्याच्या विकासाला सुरुवात केली. आज पाच वर्षांच्या आमच्या कार्यकाळात मोगर्रा विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “जनतेने आम्हाला जनसेवक म्हणून निवड दिली. गावाची उन्नती आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करणे हीच माझी जबाबदारी आहे. व्यक्तिगत शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचवण्याबरोबरच गावात महिला बचत भवन, कृषि गोदाम, शाळा इमारत, नवे ग्रामपंचायत भवन, रस्ते, वीज, पाणी, वाचनालय, सौंदर्यीकरण तसेच इतर गावांशी जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण अशा अनेक कामे आम्ही केली आहेत.”आमदार अग्रवाल म्हणाले, “गोंदिया विधानसभा क्षेत्रात 15 वर्षांच्या प्रतिनिधित्वात 5 हजार लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला, तर आमच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात आम्ही 40 हजार गरजूंचे घरे मंजूर केली. 90 टक्के जनतेपर्यंत शासनाच्या रेशन योजनेचा लाभ पोहोचवला. 36 हजार निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना देखील योजना मिळवून देण्याचे काम केले.” या 1 कोटी 90 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, सोनुलाताई बरेले, सरपंच रिताबाई लिल्हारे, उपसरपंच दिलीपसिंह मुंडेले, सुजीत येवले, ओमकार नागपुरे, अनिताबाई नेवरे, मोतीराम नैकाने, अनिल कुसराम, अनिल नागपुरे, अनुसया गुरबेले, सुनिताबाई नागपुरे, तिलकचंद घोरमारे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here